पुरस्कार

१. उत्कृष्ट बालस्नेही आणि महिला पंचायत पुरस्कार

तालुकास्तरीय उत्कृष्ट बालस्नेही पंचायत पुरस्कार- व्दितीय क्रमांक

तालुकास्तरीय उत्कृष्ट महिलास्नेही पंचायत पुरस्कार- व्दितीय क्रमांक

दि. 20/10/2023 रोजी कागल येथे झालेल्या कार्यक्रमात, व्हन्नूर ग्रामपंचायतला तालुकास्तरीय उत्कृष्ट बालस्नेही पंचायत पुरस्कार मिळाला. या यशासाठी सुशिल संसारे साहेब, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कागल, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, बचतगट प्रतिनिधी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षिका, बाल सरपंच, उपसरपंच, सर्व बाल पंचायतीचे सदस्य, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळे, ग्रामस्थ या सर्वांचे आभार.

२. ग्रामसमृद्धी अभियान योजना

शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागात ग्रामसमृद्धी अभियान योजना राबविण्याबाबत जीवनविद्या मिशन,मुंबई या संस्थेची मार्गदर्शन सहयोगी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली. हि योजना राबविण्याकरिता शासन निर्णयानंतर प्रथमता व्हन्नूर गावची निवड करण्यात आली.

Scroll to Top