नं.नवोन्मेषी उपक्रम / योजना तपशील
१.गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये महाराष्ट्र राज्यशासन व जीवन विद्या मिशन,मुंबई यांच्या मार्फत बालसंस्कार वर्गाच्या आयोजन केले जाते.
२.ग्रामपंचायत व लोकसभागातून आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, डोळे तपासणी शिबीर घेतले आहेत.
३.पर्यावरण संवर्धनाकरिता गायरान व मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी गावामध्ये ३५०० हून अधिक वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली आहे.
४.ग्रामपंचायत, माध्यमिक व प्राथमिक शाळा, शासकीय कर्मचारी, जीवनविद्या मिशनचे नामधारक, गावातील ग्रामस्थ या सर्वांच्या माध्यमातून गावांमध्ये वेळोवेळी ग्राम स्वच्छता अभियान राबवले आहेत.
५.गावामध्ये मा. नामदार हसन मुश्रीफ साहेब ( वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री (कोल्हापूर जिल्हा) यांच्या सहकार्याने १५ कोटीहून अधिक रकमेची विकास कामे पूर्ण केली आहे.
६.गावातील गरोदर मातांकरिता गर्भसंस्कार पुस्तकाची सोय करण्यात आली.
७.प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना डिजिटल शिक्षण घेण्याकरिता २०० टॅबलेटचे वाटप करण्यात आले.
८.जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य गावाला व वाड्यावस्त्यांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली.
९.शेतवडी मधून जाणारे सर्व पाणंद रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यात आली आहेत.
१०.गावातील मुला-मुलींना अबॅकस गणितीय पद्धतीच्या वर्गाची सोय करून देण्यात आली आहे.
११.अंगणवाडी,प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती व समाज प्रबोधन शिबिर घेण्यात आली.
१२.गावातील सुरक्षेकरिता गावामध्ये मुला-मुलींना स्वयंरक्षणासाठी कराटे व जुदोचे प्रशिक्षण दिले जातात व सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची देखील सोय केली गेली आहे.
१३.नियमीत रस्त्यांना वीजपुरवण्यासाठी गावातील ८७ खांबावर नामवंत कंपनीचे एलईडी बल्ब, २ सौरऊर्जेवरील पद दिवे     व  ६ हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत.
१४.गावातील महिलांसाठी नवीन बचत गटांची स्थापना करून स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीयकृत बँक व जिल्हा बँक यांच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून दिले.
१५.कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कृ तंत्रज्ञानासाठी लागणारे आर्थिक अनुदान मिळवून दिले तसेच शेतकरी अभ्यास दौरा व शेती शाळेचे आयोजन करण्यात आले.
१६.प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेमधून घरकुलांची बांधकामे, गोबरगॅस, स्वच्छ भारत मिशन मधून शौचालय बांधकामे करण्यात आली.
१७.प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांना १५ वित्त आयोग निधीतून सौर ऊर्जा प्रणाली कार्यरत करण्यात आली.
१८.गावामध्ये ग्रामस्थांना कौशल विकास कार्यक्रम व रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण दिले गेले.
१९.कुस्ती,कराटे-जुदो व इतर खेळांकरिता गावातील मुला-मुलींना मॅट व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.
Scroll to Top